मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील अनेक नेत्यांवर ठाकरे गटाने टीका करायला सुरुवात केली. आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिल आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले,”मी राजीनामा देतो तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या,जी काही यंत्रणा लावायची आहे ती लावा,जी काही ताकद लावायची आहे ती लावा, जेवढे खोके लावायचेत तेवढे लावा परंतु एकही मत विकले जाणार नाही. शिवसैनिक विकला जाणार नाही असं म्हणत वरळीतून उभे रहा,तुम्हाला पाडणारच असं आव्हानच आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिल.
आदित्य ठाकरे केवळ मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन थांबले नाहीत. शिंदेंसोबत गेलेल्या आमदार खासदारांना डिवचण्याचा संधी देखील यावेळी ठाकरेंनी सोडली नाही. गद्दार आमदारांनी आणि खाजदारांनी हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा असं चॅलेंज देखील ठाकरेंनी यावेळी दिल. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेते आता ठाकरेंच्या या आव्हानावर काय प्रतित्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.