बेल्हे :- शासनाकडून गोरगरिबांना दिले जाणारे रेशन धान्य काळाबाजारात विक्री साठी नेत असलेला पिकअप शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनीच पकडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. असून याबाबत आळेफाटा पोलिसांत तालुका पुरवठा अधिकारी रविंद्र दळवी यांनी नौशाद अब्बास खान (रा. राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे) जितेंद्र मानसिंग शिंदे (राहणार पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे), रंजना राजेंद्र गोफने व अजित राजेंद्र गोफने (दोन्ही राहणार पेमदरा तालुका जुन्नर जिल्हा पुणे) फिर्याद देऊन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दि. 03 रोजी सकाळी 11.30 वाजता चे सुमारास शिंदेवाडी (ता.जुन्नर जिल्हा पुणे) गावचे हद्दीत जमीन गट नंबर 932 मध्ये मोकळ्या जागेत शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच 14 ए एस 9066 यामधून 69 तांदळाच्या गोण्या एकूण 3450 किलो तांदूळ हा पिकअप गाडी क्रमांक एम एच 14 एच यु 5848 यामध्ये खाली करून शासकीय धान्य वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच 14 ए एस 90 66 यावरील चालक नावे नौशाद अब्बास खान राहणार जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे व पिकअप गाडी क्रमांक एम एच 14 एच यु 5848 यावरील चालक नावे जितेंद्र मानसिंग शिंदे राहणार पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे स्वस्त धान्य दुकानदार रंजना राजेंद्र गोफने व तिचा मुलगा अजित राजेंद्र गोफने यांनी संगनमताने स्वतःचे फायद्यासाठी शासकीय धान्याचा अप्रमणिकपणे अपहार करून शासनाची फसवणूक करून नियमाप्रमाणे वितरणासाठी पाठवले असतात. सदरचा माल हा काळया बाजारात विक्री केला आहे. म्हणून या चौघा विरुद्धकायदेशीर फिर्याद रवींद्र पांडुरंग दळवी वय 30 वर्षे व्यवसाय पुरवठा निरीक्षक जुन्नर (सरकारी नोकरी) राहणार बारव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी आळेफाटा पोलिसांत दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस करत आहेत.