पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागाने आयईटीई पुणे केंद्राच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील आयईटीई प्रकल्प स्पर्धा २०२४ चे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांच्या ६६ गटांनी प्रकल्पांचे प्रदर्शन केले. त्यांचे मूल्यांकन उद्योग तज्ज्ञांनी केले. संस्थेशी संबंधित उत्कृष्टतेचे मानक कायम ठेवले. या वेळी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी मनोगत व्यक्त केले. नवी दिल्लीतील आयईटीईचे डॉ. डी. एस. बोरमाने, बीओएस ई अँड टीसी, एसपीपीयू, पुणेचे अध्यक्ष डॉ. एस .डी. शिरबहादूरकर आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी विश्वस्त प्रा. सचिन सानप, प्राचार्य डॉ. एम. पी. डाळे, विभागप्रमुख डॉ. प्रणोती माने यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वस्त डॉ. ए.एस. चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. पी. एन. कोटा यांच्या समन्वयाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागाच्या आयईटीई स्टुडंट फोरमच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.