मुंबई – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री पलक तिवारी मिड नाईट एका सिनेमाच्या डेटवर स्पॉट झाले होते. इब्राहिम – पलकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. पण याच दरम्यान इब्राहिमचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यानंतर इन्स्टा यूजर्सनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
इंस्टेंट बॉलिवूडने सोशल मीडियावर इब्राहिम अली खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इब्राहिमचा चित्रपट पाहिल्यानंतरचा आहे. व्हिडिओमध्ये इब्राहिम फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे आणि ‘आ जाओ, आ जाओ, मीडिया भी है यहाँ पे… .जो मेरे मुंह में घुस गया है’. यानंतर तो फोन ठेवतो आणि काही पैप्सशी बोलून गाडीत बसतो आणि निघून जातो.
इब्राहिम अली खानचे असे वागणे पाहून इंस्टाग्राम वापरकर्ते संतापले आहे आणि त्याची आता सोशलवर शाळा घेतली आहे. सोशल मीडिया यूजर्सनी इब्राहिमला खूप ट्रोल केले आहे. एकाने लिहिले, ‘एकदा तोंडाच्या आत जा, मग समजेल.’ दुसर्याने लिहिले, ‘तुम्ही त्याला का फॉलो करत आहात, त्याची औकात काय आहे? असं म्हणत त्याला आता ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
इब्राहिम अली खानने अद्याप कोणत्याही प्रकारच्या चित्रपटात काम केलेले नाही परंतु पलक तिवारीने नुकतेच पदार्पण केले आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटात पलक सलमान खानच्या सोबत दिसली होती आणि तिला खूप पसंती मिळाली होती. पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते आणि तिची फॅन फॉलोइंग खूपच प्रभावी आहे.