मुंबई – अभिनेता मिथुन चक्रवर्ती आपल्या जमान्यातील मोठा सुपरस्टार होता. मूळचा कोलकत्त्यातील असलेला मिथुन चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला होता. तब्बल १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मिथुनने नुकतीच एका रिऍलिटी शो दरम्यान आपल्या स्ट्रगलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मिथुनदाच्या आठवणी ऐकून सर्वचजण भावून झाले.
सारेगामापा लिटिल चॅम्सच्या शोमध्ये अभिनेता मिथुनने छोट्या कलाकारांना आपल्या स्ट्रगलचे किस्से सांगितले. यावेळी तो म्हणाला, अनेकदा अभिनयापेक्षा त्याच्या दिसण्याच्या कलरटोनवरून त्यांचा अपमान करण्यात आला होता. त्यावेळी अनेकदा जेवणापासून ते झोपण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टींचे हाल झाल्याचे मिथुनदा सांगतो. तसेच हे दिवस दुसऱ्या कोणावरही येऊ नयेत असंही मिथुन यावेळी म्हणाला.
मिथुनने 1976 मध्ये मृगया या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 80, 90 च्या दशकात मिथुनने डिस्को डान्सर, वरदत, बॉक्सर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. मिथुनचा मागील रिलीज द काश्मीर फाइल्स होता. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. यासोबतच मिथुन अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील दिसले होते.