नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे. शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून शिंदे गटाचा पाठिंबा असणारे भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू योग्य आहेत. भरत गोगावले यांची एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून निवड केली होती. ज्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली होती. नार्वेकर यांच्या निर्णयावरही कोर्टाने ताशेरे ओढले. तर न्यायालयानं व्हिपचा अधिकार सुनील प्रभू यांनी जो बजावला तो योग्य होता असे सांगितले आहे. तर गोगावले यांची नियुक्ती आणि त्यांचा अधिकार बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले भरत गोगावले ?
यावर भरत गोगावले यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य आहे. कसं बेकायदेशीर ठरवलं आहे ते आमचे विधीतज्ज्ञ पाहतील. आणि जे काही ठरवतील त्यात आम्हाला समाधाना मानावं लागेलं. तसेच आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण हे पद मी स्वतःहून घेतलं नव्हतं. प्रतोद पद मला द्या असं म्हटलं नव्हतं. आमच्या सर्व मंत्र्यांनी बसून ठरवलं होतं. सगळ्यांनी ते मान्य केलं. त्यामुळे कोर्टाने कोणत्या मुद्यावरुन माझं पद बेकायदेशीर ठरवलं आहे. आमजे विधीतज्ज्ञ ठरवतील,” अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे.