नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्याला 24 तास उलटत नाही त्या आतच या लोकांनी माघार घेत पुन्हा कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आम्ही राहुल गांधी यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे त्यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हटले आहे.
कॉंग्रेसचे दिल्ली उपाध्यक्ष अलि मेहदी, नगरसेविका नाजीया खातून आणि मुस्तफाबादच्या नगरसेविका साबीया बेगम यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. मला कोणतेही पद नको आहे. मी केवळ राहुल गांधी यांचा कार्यकर्ता म्हणून पक्षात राहणार आहे.
माझ्याकडून चूक झाली आहे. त्याबद्दल मी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आमच्या भागातील सगळ्यांचीच हात जोडून माफी मागतो. मी पहिल्यापासून कॉंग्रेसमध्ये होतो व यापुढेही राहणार आहे. माझे पिताही 40 वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये आहेत. नाजीया खातून आणि साबीया बेगमही कॉंग्रेसमध्ये परतल्या आहेत असे अली मेहदी यांनी व्हिडिओ आणि त्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ते लवकरच परत येतील अशी आम्हाला खात्री होती असे नमूद करत कॉंग्रेस नेत्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. आपले घर आपलेच असते. उशीर होण्याच्या अगोदर परतले त्याबद्दल आभार असे काही जणांनी म्हटले आहे.