अभिनेता इम्रान खानने सांगितले, ‘लग्न’ मोडण्याचे कारण…

bollywood news । अभिनेता इम्रान खान त्याच्या जीवनशैली आणि वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने 2011 मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्न केले आणि 2019 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. तेव्हापासून हे जोडपे वेगळे राहत होते पण ब्रेकअपच्या कारणाबाबत कोणीही काहीही सांगितलेले नाही. आता अखेर इम्रानने त्याचे लग्न मोडल्याचे खरे कारण सांगितले आहे.
अभिनेत्याने सांगितले की, त्याला या प्रकरणात कोणत्याही प्रकारची गॉसिप नको आहे, परंतु तो अंतर्गत संघर्षाने झगडत होता आणि त्याला कोणताच पाठिंबा मिळाला नाही, ज्यामुळे त्याचे नाते टिकले नाही. मुलाखतीत इम्रानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.
तो म्हणाला, “मी याबद्दल जास्त बोलणार नाही कारण मी गॉसिपला चालना देण्यात थोडासा संकोच करतो, परंतु जेव्हा मी या सर्व ओझ्याशी आणि माझ्या अंतर्गत संघर्षाशी झुंजत होतो तेव्हा मला जाणवले की माझे लग्न आणि माझे नाते हेच आहे. ज्याचा मला खूप त्रास होत होता.’
इम्रान पुढे म्हणाला की, ‘दोघांचे नाते जे व्हायला हवे होते ते नव्हते आम्ही एकमेकांसोबत असूनही एकत्र नव्हते. माझ्या आयुष्यातील अडचणीशी मी एकटाच झगडत होता. त्यामुळे आमच्या नात्यात दुरावा आला. असेही त्याने सांगितले.
अवंतिका आणि इमरानला एक मुलगी असून तिचे नाव इमारा आहे. लग्नाच्या 8 वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, तरी दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. अवंतिकाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नक्कीच एक इशारा दिला होता. अखेर 2023 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होत असल्याचा निर्णय घेतला.





