सशाची करता करता शिकाऱ्याची शिकार

बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू

कापूरहोळ- सशाच्या शिकारीसाठी शेतात गेल्यानंतर चुकून बंदुकीतून सुटलेली गोळी लागून एकाचा मृत्यू झाला. अमित दीपक भडाळे (वय 25, रा. कांजळे, ता. भोर), असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.21) रात्री आठच्या सुमारास अमित दीपक भडाळे, अक्षय अंकुश जाधव व काळुराम जाधव (रा. कांजळे, ता. भोर) हे तिघेजण साळवडे हद्दीत कामथडी ते करंदी रोडवर डोंगरात सशाची शिकार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अमितने आजोबांच्या नावे असलेली बंदूक घेतली होती. डोंगरात त्यांना ससा दिसल्याने अमितने सशाच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. मात्र, ससा पळून गेल्याने अमित हा मागे गेला. झुडपात ससा शोधताना अमित हा बांधावरून खाली पडल्यानंतर नकळतपणे बंदुकीच्या चाफला धक्‍का लागल्याने गोळी त्याच्या छातीत घुसली. यावेळी बंदुकीचा आवाज आल्याने त्याचे दोन्ही मित्र पळत गेले. त्यावेळी अमित रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या छातीतून रक्‍तस्त्राव होत होता. मित्रांनी तात्काळ अमितला मोटरसायकलवरून सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार के. वाय. सागवेकर करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.