अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे बॉलिवूडचे हॉट जोडपे म्हणून चर्चेत असतात. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगत असतात. अशातच करण जोहरच्या पार्टीत हृतिक आणि सबा अतिशय रोमँटिक अंदाजात दिसले.
View this post on Instagram
करण जोहरने 25 मे रोजी 50 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या बर्थ डे पार्टीत अनेक मोठे आणि प्रसिद्ध स्टार्स दिसून आले. यात हृतिक – सबाच्या रोमँटिक अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
काळ्या ड्रेसमध्ये ट्विनिंग करून, हृतिक आणि सबाने ग्रँड एन्ट्री केली. येथे दोघेही आनंदाने हातात हात घालून फिरताना दिसले. इतकंच नाही तर दोघांनी पहिल्यांदाच पापाराझींसमोर एकत्र पोजही दिल्या.
View this post on Instagram
पोज देताना दोघेही एकमेकांकडे बघताना दिसले. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला काही युजर्सने लाईक केले आहे तर काहींनी यावरून या दोघांना ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
या जोडप्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साबा आणि हृतिक पार्टीच्या रेड कार्पेटवर एकत्र फिरताना दिसत आहेत.
हृतिक रोशन आणि सबा आझाद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. १७ वर्षांचा फरक आहे हे दोघे पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र आले आहेत. सबा आणि हृतिकने काही काळापूर्वीच त्यांचे नाते इंस्टाग्रामवर अधिकृत केले होते. सबाने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन प्रोजेक्ट मिनीमनची घोषणा केली. याबद्दल हृतिकने त्याचे अभिनंदन केले. तेव्हा सबाने इंस्टाग्रामवर प्रेमाची कबुली दिली होती.