ऑलिंपिकमध्ये भारताला मैदानी स्पर्धेत आजअखेर कधीही पदक मिळालेले नाही. ऑलिंपिकमध्ये आपण अद्यापही किती मागे आहोत हे मैदानी स्पर्धेतील आपले राष्ट्रीय विक्रमांवरून दिसून येते.
आतपर्यंत केवळ दोनच भारतीयांचे मैदानी स्पर्धेत एक शतांश सेकंदाने पदक हुकलेले आहे. मिल्खासिंग यांचे 1960 मधील रोम येथील ऑलिंपिक स्पर्धेत आणि पी. टी. उषाचे 1984 मधील लॉसएंजेलिस येथील ऑलिंपिकमध्ये.
दोन्ही धावपटूंमध्ये एक समानता आहे आणि ती म्हणजे मिल्खासिंग यांचे 400 मीटरच्या शर्यतीत 0.1 सेंकदाने पदक हुकले तर उषा 400 मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीत एक शतांश सेकंदाने चौथी आली. त्यानंतर कुठलाही खेळाडू इथपर्यंतही पोचू शकलेला नाही ही खेदाची गोष्ट आहे.
मैदानी स्पर्धेतील आपल्या खेळाडूंचे राष्ट्रीय विक्रम पाहिले तर या स्पर्धांमध्ये आपण किती मागे आहोत हे लक्षात येते. उदाहरणार्थ, पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचा राष्ट्रीय विक्रम आणि 1962 मधील या शर्यतीतील जागतिक विक्रम बरोबरीत आहेत. या शर्यतीतील सध्याचा जागतिक विक्रम 1 मिनिट 40 सेकंद आणि 91 मिलिसेकंद एवढा आहे. भारतीय राष्ट्रीय विक्रम तब्बल पाच सेकंदाने मागे आहेत.
तेवढ्या वेळात शर्यतीतील सगळे धावपटू पुढे निघून जाऊ शकतात. सध्याचे भारताची मैदानी खेळातील बहुतेक सर्व राष्ट्रीय विक्रम 1960-70 मधील जागतिक विक्रमांची बरोबरी करतात. भालाफेकीत नीरज चोप्राची कामगिरी जागतिक विक्रमाच्या आसपास आहे. त्याची कामगिरी 88.07 मीटर अशी आहे. या कामगिरीवर तो 1990 च्या जागतिक स्पर्धेत अव्वल कामगिरी करणारा ठरला असता.
100 मीटर धावण्याची शर्यत सध्याचा भारताचा राष्ट्रीय विक्रम – 10.26 सेकंद
जागतिक विक्रम – 9.58 सेकंद
कुठल्या वर्षात भारतीय विक्रम जागतिक विक्रम ठरला असता – 1956
आपण किती वर्षे मागे आहोत? – 65 वर्षे
200 मीटर धावण्याची शर्यत
सध्याचा भारताचा राष्ट्रीय विक्रम – 20.63 सेकंद
जागतिक विक्रम – 19.19 सेकंद
कुठल्या वर्षात भारतीय विक्रम जागतिक विक्रम ठरला असता – 1960
आपण किती वर्षे मागे आहोत? – 61 वर्षे
110 मीटर अडथळ्यांची शर्यत
सध्याचा भारताचा राष्ट्रीय विक्रम – 13.58 सेकंद
जागतिक विक्रम – 12.80 सेकंद
कुठल्या वर्षात भारतीय विक्रम जागतिक विक्रम ठरला असता – 1956
आपण किती वर्षे मागे आहोत? – 65 वर्षे
400 मीटर धावण्याची शर्यत
सध्याचा भारताचा राष्ट्रीय विक्रम – 45.21 सेकंद
जागतिक विक्रम – 43.03 सेकंद
कुठल्या वर्षात भारतीय विक्रम जागतिक विक्रम ठरला असता – 1960
आपण किती वर्षे मागे आहोत? – 61 वर्षे