व्हेज-नॉनव्हेजची चवच न्यारी…बारामती तालुक्यातील हॉटेल ग्रॅंड, हॉटेल सत्या, हॉटेल ब्रॅंडची ख्याती सर्वत्र भारी… काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनात ठेवून बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांनी आपल्या कुशल आणि अनुभवी व्यवस्थापनाच्या तसेच आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याच्या जोरावर हॉटेल ग्रॅंड, हॉटेल सत्या, हॉटेल ब्रॅंडच्या रुचकर खाद्यांमुळे खवय्येंची पावले वारंवार हॉटेल ग्रॅंड, सत्या, ब्रॅंडकडे वळतात आणि तीही कुटुंब, मित्रांसमवेतच. या ग्राहकांच्या जोरावरच काळे यांनी हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. काळे यांच्या याच खासियतेवर दैनिक “प्रभात’ने टाकलेला “फोकस’.
बारामती-मोरगाव जुन्या रस्त्यावरील “हॉटेल ग्रॅंड’ची चव ग्राहकांच्या जिभेवर वर्षांनुवर्षे रेंगाळात आहे. सत्यव्रत काळे यांच्यातल्या खवय्याची अपार मेहनत त्यामागे किती आहे, हे इथली चव चाखल्यावर लगेचच ग्राहकांच्या लक्षात येईल. एखादा चांगला आणि नवा फूड जॉइन्ट दिसला की त्यावर तुटून पडणारे खवय्ये विशेषच म्हणावे लागतील. ठिकठिकाणच्या चवदार चवी चाखून आल्यानंतर या सगळ्याच चवी एकाच छताखाली मिळाल्या तर? असा विचार सत्यव्रत काळे यांच्या मनात आला आणि हॉटेल ग्रॅंडचा जन्म झाला. त्याआधी काळे यांनी 2016 मध्ये हैद्राबादी दम बिर्याणीसाठी स्पेशल असे हॉटेल गर्जना बारामतीत सुरू केले.
हॉटेलचे वैशिष्ट्ये…
लोणावळा गोव्याच्या धर्तीवर “हॉटेल ग्रॅंड’
व्हेज-नॉनव्हेजच्या 360 डिश
सेलिब्रेशन हॉल : वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, साखरपुडा, किटी पार्टी
शंभर लोकांची बैठक व्यवस्था
स्वच्छता, हायजेनिक किचन, प्रशिक्षित स्टाफ
हायजेनिक चिकन मुर्ग मुसल्लम”हॉटेल ग्रॅंड’ची स्पेशालिटी
बारामतीत कुटुंबासह हॉटेलमध्ये जाता येईल, अशी ठिकाणे खूप कमी. हीच उणीव “हॉटेल ग्रॅंड’च्या रूपानं काळे यांनी भरून काढायचे ठरवले. खायला येणाऱ्या कोणाही खवय्याचा दुजाभाव न होता गरीब आणि श्रीमंत अशा कोणत्याही वर्गातल्या माणसाला सहजपणे हॉटेलिंग करता येईल, असे त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच त्यांनी “फॅमेली कॉटेज’ ही संकल्पना बारामतीत राबवली. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्रुपला स्वतंत्र ए. सी. आणि टीव्ही असलेली स्वतंत्र रूम उपलब्ध करून शाही भोजनाचा अनुभव घेता येईल, अशी आगळी वेगळी रचना केली. ही रचनाच “हॉटेल ग्रॅंण्ड’चे वैशिष्ट्य ठरले.
“हॉटेल ग्रॅंड’मध्ये कोणताही पदार्थ मागवा, तो शाही पद्धतीने सजवूनच तुम्हाला दिला जाणार, व्हेज-नॉनव्हेज पद्धतीच्या खवय्यांसाठी हे हॉटेल परिपूर्ण मेजवानीच आहे. पदार्थांची क्वांटिटीही थोडी जास्त आहे. इथे मिळणारे पदार्थही विशेष आहेत. कोकणासारखी चवदार मच्छी, रहू, कटला, भांगडा ही इथली खासियत. इथल मटण ताट खाल्ल्यास तृप्त होऊनही केवळ पोट भरल्याने अतृप्त राहाल. इथल्या प्रत्येक पदार्थाबद्दल थोडंबहुत असेच सांगता येईल. त्याचे कारण सत्यवान काळे यांच्या खवय्यांना तृप्त करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीत आहे.
इतर डिशेश
व्हेज पनीर चंदगडी, व्हेज मयुरी, पनीर राजवडी, पनीर हनी, पनीर लाहोरी, पनीर पटियाला, व्हेज चिलीमिली, पनीर पसंदा, पनीर डोंगरी, मशरूम डोंगरी, पनीर मुमताज, पनीर झलक पलक, व्हेज तिरंगा, व्हेज आचारी, व्हेज अंगारी.
चिकन डिश
चिकन रोगण, चिकन दो प्याजा, तंदूर बटर चिकन, चिकन हनी, गावरान चिकन कोंबडी, चिकन मोगलाई, चिकन बटर तंदुरी.
मटन डिश
मटण गावरान हांडी, मटण मेंबर थाळी, मटण बांबू बिर्याणी, मटण मटका बिर्याणी, मटण उकड, मटण नागपुरी हंडी, मटण रोस्ट, मटण बिर्याणी, मटण दो प्याजा, मटण आळणी, गावरान तुपातील मटण.
हॉटेल सत्या चिकन तंदुरी रेस्टॉरंट
खासियत 120 डिशेशची. मटण साठे, चिकन सिक्सटी फाय, चिकन क्रेपसी, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी, चिकन कॉम्बिनेशन नूडल, चिकन फ्रांची, चिकन हक्का नूडल्स, चिकन क्रेप सी नूडल, चिकन कोळीवाडा, चिकन अंडा राईस, चिकन शेजवान राईस, चिकन कॉम्बिनेशन, चिकन जंजीर नूडल, व्हेज पनीर फ्राय राईस, व्हेज मंचुरियन राईस, व्हेज पनी क्रेपसी राईस, मशरूम मंचूरियन राईस, व्हेज हरभरा पकोडा, पनीर गार्लिक राईस. टोमॅटो सूप, मंचाव सूप, जंजीर सूप, स्वीट कॉर्न सूप, पालक सूप.
– प्रमोद ठोंबरे(बारामती तालुका प्रतिनिधी)