नागपूर – येथे मध्य रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे परिसरातील काही भागात पाणी शिरले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरले आहे. या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. heavy rain in nagpur
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली.
नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 23, 2023
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.’ heavy rain in nagpur
दरम्यान, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा. अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झालेले आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये.
नागपूर महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करा. heavy rain in nagpur