जखमी तरूणाला 16 लाख रुपये नुकसान भरपाई

लोकअदालतमध्ये शिक्कामोर्तब

पुणे – अपघातात जखमी झालेल्या हेल्पर तरूणाला 16 लाख रुपये मिळणार आहेत. शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये यावर शिक्कामोर्तब झाला.
गोपी आरवामाला (वय 28) असे त्याचे नाव आहे. 2017 मध्ये झालेल्या अपघातात तो जखमी झाला होता. त्याने ऍड. कांचन धामणकर यांच्यामार्फत भारती एक्‍सा कंपनीच्या विरोधात येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.

कात्रज देहुरोड बायपास रस्त्यावरून तो आणि त्याचा मित्र दुचाकीवरून चालले होते. मित्र दुचाकी चालवत होता. तर, गोपी पाठीमागे बसला होता. मामुर्डी गावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये गोपी याच्या डोक्‍याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी 8 लाख रुपये खर्च झाले.

पायाच्या उपचारासाठी राजीव गांधी योजनेचा लाभ झाला. तो हेल्पर होता. दररोज पाचशे रुपये कमवत होता. दुखापत, आयुष्यातील महत्त्वपूर्ण कालावधीचे झालेले नुकसान पाहता 20 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, तडजोडीअंती त्याला 16 लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.