हिंदू धर्मात अनेक सण उत्सव साजरे होतात. प्रत्येक सणाला महत्व आहे. आता गणपतीच्या उत्सव जवळ येतोय. बाप्पाच्या स्वागतासाठी अनेक वाद्यांचे वादन केले जाते. ह्यात ढोल- ताशे, नगारा, लेझीम ह्यांचा समावेश असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? पुण्यात शंखनाद नावाचे एक पथक आहे, होय, केशव शंखनाद पथक. तुम्ही म्हणाल कि पूर्वीच्या वेळी शंखनाद हा पूजेच्यावेळी, किंवा युद्धाच्या काळात केला जायचा, मात्र केशव शंखनाद पथक शंखनाद करून पारंपरिक वाद्याचे वादन करून परंपरा जपत आहे.