काळ्या रंगाच्या वेस्टन ड्रेसमध्ये खुललं ‘सोनाली कुलकर्णी’चं सौंदर्य

सोनाली कुलकर्णीचा "हा" अंदाज तुम्ही पाहिला का?

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून. या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

नुकतंच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या वेस्टन ड्रेसने सोनालीच्या सौंदर्याला चार चांद लागले. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

तसेच, सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली. याशिवाय सोनाली सिंघम रिटर्न्समध्येदेखील पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.