तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीचा “हसीन दिलरुबा’ पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. 2 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचे हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत.
स्वतः तापसी पन्नूने ही माहिती दिली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. “कहाणी आशिकाना, राज किलर, हसीन दिलरुबा लवकरच नेटफ्लिक्सवर.’ असे तिने म्हटले आहे.
या सिनेमाचे शूटिंग गेल्यावर्षी जानेवारीत हरिद्वारमध्ये सुरू झाले होते. आनंद एल. राय या सिनेमाची निर्मिती करत आहेत.
“हसीन दिलरुबा’चे बहुतेक शूटिंग हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये केले गेले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. पण करोनामुळे रिलीज पुढे ढकलावा लागला होता.
विक्रांत मेस्सीने यापूर्वी “छपाक’मध्ये काम केले आहे. तर तापसी पन्नू यापूर्वी “सांड की आंख’मध्ये भूमी पेडणेकरबरोबर दिसली होती. या दोघींच्याही कामाचे खूप कौतुक झाले होते.
विक्रांत मेस्सी आणि तापसी प्रथमच एकत्र काम करत आहेत. त्यांची केमिस्ट्री आता पडद्यावरच प्रत्यक्ष बघायला हवी.