मंचर, (प्रतिनिधी)- एकलहरे (ता. आंबेगाव) येथील मशिदीमध्ये रमजान ईद-उल-फित्र सणानिमित्त मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी गुलाबाचे फुल देऊन सणाच्या शुभेच्छा देत हिंदू मुस्लिम ऐक्य जपले आहे.
एकलहरे, फकीरवाडी, कळंब गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत मौलाना मोहम्मद तय्यब हुसेन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण केले. यावेळी मौलानांनी नमाज, दुवा, खुदबा पठण तसेच रमजान ईदचे महत्व मुस्लिम बांधवांना पटवून दिले.
हिंदू मुस्लिम ऐक्याचा पवित्र रमजान ईद सण हिंदू मुस्लिम भाविकांनी एकमेकांना आलिंगन देऊन आणि गुलाब पुष्प देऊन साजरा केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख माजी सरपंच संतोष डोके यांनी हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी हभप किसन महाराज डोके, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली डोके,
मनोज डोके, नवनाथ पोखरकर पोलीस जवान अजित पवार, मौलाना मोहम्मद तैय्यब हुसेन शेख, नजीर उर्फ बाबा इनामदार, रफीक इनामदार, मोहम्मद इनामदार, पत्रकार आयुब शेख, इसाक शेख, साजिद शेख, अल्ताफ इनामदार, साबिर इनामदार, इरफान इनामदार, उस्मान मणियार, इमाम शेख यांच्यासह आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.