पिंपरी – करोनाची तिसरी लाट ओसरल्याने शहरातील मुस्लिम बांधवांनी दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा, नमाज, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुराण पठण, जकातुल फित्र आदी संपन्न झाले. त्यानंतर चंद्रदर्शनाने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त सर्व धर्मीय बांधवांनी शुभेच्छा देऊन एकोप्याचा संदेश दिला.
सोमवारी चंद्रदर्शन झाल्यामुळे मंगळवारी (दि.3) शहरात ईद साजरी करण्यात आली. सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मशिदव मदरशांकडे वळाली. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मशिद व मदरशांमध्ये मौल्लानांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामूहिकपणे नमाज पठण केले. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुस्लिम बांधवांच्या घरोघरी शिरखुर्मा, शेवया अशा गोड आहाराचा स्वाद, नातेवाईक, मित्र मंडळींनी घेतला. त्यात सर्व धर्मियांचा समावेश होता.
चिंचवडगाव येथील आलमगीर शाहिद मजीदमध्ये मौलाना मिनहाज उद्दीन यांनी सत्याची कास अंगिकारा, आई-वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी आलमगीर शाही मजीदच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. मुस्लिम बांधवांनी एकोप्याने राहून एकमेकांच्या सुखःदुखात सामिल होत समाज एकोप्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन उपायुक्त इप्पर यांनी केले. यावेळी माजी महापौर आझम पानसरे, निहाल पानसरे, इम्रान पानसरे, अख्तर पिंजारी, नाजीम बसरी, इक्बाल शेख, इक्बाल मुलानी, गुलामअली भालदार यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या नमाज पठणानंतर शहरातील विविध ठिकाणच्या कब्रस्थानात जाऊन मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या ठिकाणी जावून आदरांजली वाहिली.
–
दापोडीतील जयदा मशिदीमध्ये मोलाना शफिक कारी यासीन यांनी नमाज पठण केले. यावेळी आसिफ मणियार, मौलाना ताहीर शेख, शकील शेख मौलाना खालील शेख व धनराज ढोले, रामा गायकवाड, बाजीगर बोरुडे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. मदरसा फैजुल उलूम एस. एम. एस.कॉलनी येथे कारि इकबाल यांनी नमाज पठण केले. त्यावेळी मोलाना उमर गाजी, सलीम शेख, आशिष भोसले, विनायक काटे, प्रतीक पवार, निखिल काटे आदी पस्थित होते.
जामा मशिद बॉम्बे कॉलनी येथे खुशीद भाई शेख यांनी नमाज पठण केले. यावेळेस शौकत सुजार, हमीद मुलानी, झालीत तांबोळी, गौरव कदम आदी उपस्थित होते. मज्जित उमर फारूक एज्युकेशन ट्रस्ट सिद्धार्थनगर येथे कारी इमतियाज यांनी नमाज पठण केले. यावेळी समीर नदाफ, इर्शाद शेख, नईम काजी, जाफर शेख यावेळी उपस्थित होते.