गणेश चतुर्थीनिमित्त सर्वजण एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यात बॉलिवुडमधील कलाकारही मागे कसे राहतील. त्यांनीली आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवुडमधील खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमार याने चाहत्यांना विश करत गणेशाकडे सर्वाच्या अडचणी दूर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या उत्साहपूर्ण वातावरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवुडमधील “सिंघम’ अर्थात अजय देवगनने चाहत्यांना शुभेच्छा देत एक ग्राफिकल इमेज शेअर केली आहे. तर अभिनेत्री कंगणा राणावतच्या टीमने लालबागच्या मूर्तिसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी सर्वांना आनंदी ठेवण्याची प्रार्थना केली आहे.
अनिल कपूरने मंत्र पोस्ट करत गणेश चतुर्थीची शुभकामना दिल्या आहेत. त्याने लिहिले की, “वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।’ मी देवाकडे प्रार्थना करतो की त्याने सर्वांना चांगले आरोग्य, आनंदी आणि यश देवो. हॅपी गणेश चतुर्थी.
याशिवाय मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, अनुपम खेर, रवीना टंडन, लारा दत्ता, दिया मिर्झा, विवेक ओबरॉय, अर्जुन रामपाल आणि मनोज वाजपेयी यासारख्या स्टार कलाकारांनीही शुभेच्छाचे संदेश पोस्ट केल्या आहेत.