गुवाहाटी – आसाममधील गुवाहाटी येथे रविवारी(दि.28) रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथील जळुकबारी परिसरात वाहनांच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे.
आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षाचे 10 विद्यार्थी सकाळी एका कारमधून कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडले. वाटेत जळुकबारी परिसरात त्यांचे वेगवान वाहन प्रथम रस्ता दुभाजकावर आणि नंतर व्हॅनला धडकले.
या अपघातात सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. ड्रायव्हरसह व्हॅनमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.