मोदी सरकारच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी
बर्लिन – भारतातील विद्यार्थ्यांना करोना संकटात परीक्षेसाठी बसण्याची सक्ती करणं अन्यायकारक आहे. जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचं मी समर्थन करते, असे ट्विट करत ग्रेटा थनबर्गने भारतीय विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
करोना संकटामुळे नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे, असा निर्वाळा दिला आहे.
यादरम्यान स्वीडनची 17 वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका करत मोदी सरकारच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे.