राजगुरूनगर-आद्य क्रांतीकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची 229 वी जयंती खेड तालुक्यात करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. खेड तहसीलदार, खेड पंचायत समिती कार्यालय, तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चाकण व खेड पोलीस ठाणे आदी ठिकाणी साजरी करण्यात आली.
खेड पंचायत समितीमध्ये उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राजगुरूनगर शहर प्रमुख, दिलीप तापकीर, गटविकास अधिकरी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, सामाजिक कार्यकर्ते वामन बाजारे, एल. बी. तनपुरे उपस्थित होते.
तहसीलदार कार्यलयात तहसीलदार सुचित्रा आमले, चाकण ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या हस्ते आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेलाअभिवादन करण्यात आले.