पिंपरी – वाढीव बिले आकारून करोना बाधितांची आर्थिक लूट करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील 21 नामांकित रुग्णालयांचे पितळ उघडे पडले आहे. या रुग्णालय व्यवस्थापनांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या सर्व रुग्णालयांना आयकर विभाग सहआयुक्त एन. अशोक बाबू यांनी नोटीस बजावली आहे.
नोटीस पाठवलेल्या रुग्णालयांची नावे
साईनाथ हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, आयुष मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टर्लिंग हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल (निगडी), आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेहरूनगर), जीवनज्योती हॉस्पिटल (काळेवाडी), फिनिक्स हॉस्पिटल (थेरगाव), अंगद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (भोसरी), ऑक्सिकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, लाईफपॉइंट हॉस्पिटल (वाकड), ऍकॉर्ड हॉस्पिटल, मेट्रो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (रहाटणी), देसाई ऍक्सिडंट ऍन्ड जनरल हॉस्पिटल आदी रुग्णालयांचा समावेश आहे, असे प्रशासनाने सांगितले.