पुणे – पुण्यातून काल (गुरूवार) सायंकाळच्या सुमारास एसटीच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदारांच्या शिवनेरी आणि शिवशाही बस मार्गस्थ झाल्या. रात्री उशीरापर्यंत 8 बस स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून बस प्रवासी घेऊन धावल्या. यामुळे आता एसटीच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदारांच्या बस धावण्यास मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे दिसत आहेत.
शासनाकडून विविध मार्गांनी एसटी कर्मचार्यांचा संप मोडून काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणजे एसटीच्या ताफ्यात असलेल्या खासगी ठेकेदाराच्या शिवनेरी आणि शिवशाही बस पुण्यातील एसटी स्थानकातून प्रवासी वाहतूक करायला गुरूवारी सायंकाळच्या सुमारास बाहेर पडल्या. यामुळे एसटी कर्मचार्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे
पुण्यातून सुटलेल्या शिवनेरी, शिवशाही बस
– स्वारगेट स्थानक – 1 बस
– शिवाजीनगर (वाकडेवाडी) स्थानक – 1 बस
– पुणे स्टेशन स्थानक – 6 बस
– एकूण – 8 बस (सर्व खासगी ठेकेदार)