नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचे दर 75 रुपयांनी वाढून 51,863 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर मात्र 453 रुपयानी कमी होऊन 67,996 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर स्थिर राहिले.
सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,936 डॉलर व चांदीचा दर 25.40 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. रशिया -युक्रेन युद्धामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये बरीच वाढ झाली आहे. युध्द संपत नाही तोपर्यंत या दोन धातूंचे दर चढे राहण्याची शक्यता आहे.