नवी दिल्ली – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 57 रुपयांनी वाढून 47,263 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 183 रुपयांनी वाढून 61,054 रुपये प्रत्येक किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,810 डॉलर व चांदीचा दर 22.78 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
आगामी आठवड्यात बऱ्याच सुट्या असल्यामुळे शेअर बाजार व धातू बाजारात परिस्थिती अनिश्चित राहण्याची शक्यता असल्याचे विश्लषकांनी सांगितले. भारतामध्ये सध्या लग्नामुळे सोन्याच्या खरेदीत काही प्रमाणात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.