नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोन्याचा भाव 50 रुपयांनी कमी होऊन 56,270 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 140 रुपयांनी वाढून 65,720 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,840 डॉलर व चांदीचा दर 21.69 या पातळीवर गेला होता. यासंदर्भात रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घडामोडीनुसार वायदे बाजारात सोन्याच्या किमती अस्थिर आहेत.
त्या प्रमाणात भारतीय सराफातही सोन्याचे दर गेल्या आठवड्यापासून अस्थिर आहेत. आगामी काळात अमेरिका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर वाढू शकतात.