नवी दिल्ली – विविध क्षेत्राप्रमाणे सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाकडे आहे. त्यामुळे सोने आणि चांदी बाजारातील अस्थिरता कायम आहे.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर आठ रुपयांनी कमी होऊन 54,534 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 82 रुपयानी वाढून 68,287 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,787 डॉलर आणि चांदीचा दर 23.48 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.
एचडीएफसी सेक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी सांगितले की जगात सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे भारतातही हे दर सध्या अस्थिर आहेत. मात्र पुढील आठवड्यात या बाजाराला काही प्रमाणात दिशा मिळण्याची शक्यता आहे.