Gold-Silver Price Today – जागतिक बाजारात सध्या सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढून 67 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. मात्र तयार चांदीचा दर 250 रुपयांनी कमी होऊन 77,250 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,180 डॉलर आणि चांदीचा दर 24.50 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. अमेरिका आणि युरोपातील रिझर्व्ह बँका व्याजदराबाबत काय निर्णय घेतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे.
त्यामुळे इतर बाजाराबरोबरच सोने आणि चांदीच्या बाजारात अस्थिरता असल्याचे बर्याच विश्लेषकांनी नमूद केले. जर अमेरिकेतील व्याजदर लवकर कमी झाले तर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते असे समजले जाते.