Gold Rates : सोने घसरले, चांदी वधारली; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाली तर चांदीच्या दरात वाढ झाली. दिल्ली सराफत सोन्याचा दर 36 रुपयांनी कमी होऊन 45,888 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 73 रुपयांनी वाढून 61,911 रुपये प्रति किलो झाला.

याबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटीज विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सध्या अस्थिरता आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,788 डॉलर व चांदीचा दर 23.68 डॉलर प्रति औंस राहिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.