Pune News : उद्या २७ अॅागस्ट या दिवशी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांची लाडक्या गणपती बाप्पाला आरास तयार करण्यासाठी खरेदी करण्यासाठीच्या वस्तूंसाठी गर्दी वाढताना पाहायला मिळत आहे. अशातच गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावर चौकात पीएमपीएमलच्या चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्यावेळी घटनास्थळी वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या पीएमपी बस चालकाचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. त्यामुळे अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. अनिल लक्ष्मण अंबुरे (वय ४१, रा. वारजे माळवाडी) असे या पीएमपी चालकाचे नाव आहे. नेमकं काय घडलं? सोमवारी रात्री गणेशोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बेलबाग चौकात गर्दी आणि वाहतूक नियोजनासाठी फरासखाना वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी रोमेश ढावरे आणि अर्चना निमगरे तैनात होते. त्याचवेळी लक्ष्मी रस्त्यावरून पुणे स्टेशन ते कोथरूड-कुंबरे पार्क या मार्गावर धावणाऱ्या बसचे चालक अनिल अंबुरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. …अन् गर्दीतून वाट काढली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी चालक अंबुरे यांना बसमधून बाहेर काढले आणि पदपथावर झोपवून त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबुरे बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यावर ढावरे आणि निमगरे यांनी गर्दीतून वाट काढली. पोलिसांनी याबाबत फरासखाना विभागाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे आणि उपनिरीक्षक संजय गायकवाड यांना घटनेची माहिती दिली. वर्दीतला देव धावला म्हणून.. गर्दीमुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणार नाही हे लक्षात घेऊन ढावरे आणि निमगरे यांनी रिक्षातून गर्दीतून मार्ग काढत रिक्षा खासगी नेण्यात आली. वेळेवर उपचार मिळाल्याने अंबुरे यांचा जीव वाचला. यामुळे या वाहतूक कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तप्तरतेचे सर्वत्र मोठे कौतुक केले जात आहे. हेही वाचा : Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय; जाणून घ्या एका क्लीकवर…