Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
Nana Patekar Funeral : नाना पाटकेर यांच्या पार्थिवावर डोणजे येथे अंत्यसंस्कार केले जाणार

Nana Patekar Funeral: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून मराठीसह बॉलिवुड चित्रपटसृष्टीतील कलाकार, राजकीय वर्तुळातील नेतमंडळी शोक व्यक्त करत आहेत. नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अंतिमसंस्कार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्यातून एअरलिफ्ट करून पुण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर डोणजे येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
मराठी रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन, अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
तर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही मी माझ्या जवळचा मित्र गमावला असल्याची म्हणत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच प्रमोद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना, “गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सध्या नाना पाटेकर यांचे पार्थिव ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या परिवारातील सदस्य आल्यानंतर आम्ही त्यांना नाना पाटेकरांचं पार्थिव सुपुर्द करू आणि सरकारकडून जी मदत हवी आहे, ती आम्ही करणार आहोत,” असेही सांगितले.
पुण्यातील ‘नानाची वाडी’ म्हणून ओळख
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘नानाची वाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच फार्महाऊसमध्ये नाना पाटेकर अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहत होते. डोणजे येथील हे फार्महाऊस त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते.
Ashok Saraf : ‘माझा अजूनही विश्वास बसत नाही’; नाना पाटेकरांच्या निधनाने अशोक सराफ भावुक




