Pune : गणेशोत्सव काळात जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

पुणे – गणेशोत्सव काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची खरेदीसाठी व देखावे पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहतूक शाखेने जड व अवजड वाहनांना शहरातील मध्यवर्ती भागात प्रवेशबंदी घातली आहे.
उपायुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार, २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत खालील मार्गांवर २४ तास जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
शास्त्री रोड : सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक
टिळक रोड : जेधे चौक ते अलका चौक
कुमठेकर रोड : शनिपार ते अलका चौक
लक्ष्मी रोड : संत कबीर चौक ते अलका चौक
केळकर रोड : फुटका बुरुज ते अलका चौक
बाजीराव रोड : पूरम चौक ते गाडगीळ पुतळा
शिवाजी रोड : गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
कर्वे रोड : नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन कॉलेज रोड : खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक
जंगली महाराज रोड : स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
सिंहगड रोड : राजाराम ब्रिज ते सावरकर चौक
गणेश रोड/मुदलियार रोड : पॉवरहाऊस दारुवाला ते फुटका बुरुज चौक
या बंदीतून अत्यावश्यक सेवा, अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका व गणेशमूर्ती वाहतूक करणारी वाहने यांना सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन हिंमत जाधव यांनी केले आहे.





