पुणे | लक्ष्मी रस्त्यावर गर्दी; खरेदीचा शेवटचा रविवार
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – येत्या आठवड्यापासून म्हणजे २८ अॉक्टोबर पासून दिवाळीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे २० अॉक्टोबरचा शेवटचा रविवारच खरेदीसाठी असल्याने नागरिकांनी लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग सह सर्व बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी केली.
येत्या २८ तारखेला दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे. त्यामुळे दिवाळीच्या तयारीला जेमतेम आठवडाच राहिला आहे. त्यात खरेदीसाठी एकच शनिवार-रविवार हे सुट्टीचे वार शिल्लक असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
कपडे, दागिन्यांची खरेदी, तुळशीबागेत विविध अॅक्सेसरीजची खरेदी करण्याला नागरिकांनी गर्दी केली. याशिवाय फराळ आणि अन्य खरेदीसाठीही नागरिकांनी गर्दी केली.





