पुणे विभागातील 117 हॉटेल व्यावसायिकांचे अर्ज
पुणे- हॉटेल व्यवसायाला औद्योगिक दर्जा देण्याचे शासनाने घोषित केले आहे. त्यानुसार औद्योगिक दर्जा मिळावा, यासाठी पुणे विभागातून 117 हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाकडे अर्ज केले आहेत.
औद्योगिकचा दर्जा मिळाल्यास हॉटेल व्यावसायिकांना वीज दर, वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर, विकासकर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक तसेच अकृषिक कराची आकारणी यापुढे औद्योगिक दराने होणार आहे. याचा फायदा या व्यावसायिकांना होणार आहे.
या व्यवसायाला औद्योगिकचा दर्जा द्यावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. ती राज्य शासनाने मान्य केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागाकडे आलेल्या हॉटेल्सच्या अर्जाची एक महिन्यात छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.