ठाणे – पहाटेच्या सुमारास ठाण्यामध्ये जबरदस्त अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक थेट झोपडीवर पलटी झाला. यामुळे झोपडीत असेलेली चिमुरडी ट्रकखाली अडकली गेली. ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. मुंबई नाशिक हायवेवर माजिवडा ब्रिज नजदिक सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी २ क्रेन, १ पिकअप आणि अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. मुलीला क्रेनच्या मदतीने ट्रक उचलून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तात्काळ मुलीला उपचारासाठी नजदिकच्या रुग्णालयात दाखल केले. मधू भाटी असं अपघातात जखमी झालेल्या १४ वर्षीय मुलीचे नाव आहे.
ट्रक चालक मुंबईवरून नाशिकला निघाला होता यादरम्यान पहाटेच त्याचा वाहनावरून ताबा सुटल्याने अपघात झाला. यावेळी रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. अपघातानंतर मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.