WPL Live Cricket Score, GG vs DC Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीग 2024 चा दहावा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील सलग तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि त्यांना हंगामातील सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
विजयासाठी 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सची फलंदाजी या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरली. ऍशले गार्डनर वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. ऍशले गार्डनरने 31 चेंडूत 40 धावा केल्या. यादरम्यान तिने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र तिची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. याव्यतिरिक्त कॅथरीनला तीन, तनुजाला 13, तरन्नुम पठाणला 9 धावा करता आल्या. याशिवाय मेघा सिंग 10 धावा करून तर याली सतघरे सात धावा करून नाबाद राहिली. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 138 धावा करता आल्या. दिल्लीकडून गोलंदाजीत जेस जोनासन आणि राधा यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
And with that roaring win, @DelhiCapitals move to the 🔝 of the table! 🥳#DC register a 25-run victory 👏👏
Live 💻📱https://t.co/9MIuaZmvo8#TATAWPL | #GGvDC pic.twitter.com/ohKm3ebwdq
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 3, 2024
तत्पूर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मेग लॅनिंगच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरात जायंट्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून 163 धावा केल्या. या सामन्यात गुजरातच्या क्षेत्ररक्षकांनी बरेच झेल सोडले.
दिल्लीकडून मेग लॅनिंगने सर्वाधिक धावा केल्या. तिने 41 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. ॲलिस कॅप्सीने 17 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावांचे योगदान दिले. ॲनाबेल सदरलँडने 12 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या.
गुजरातकडून गोलंदाजीत मेघना सिंगने सर्वाधिक 4 बळी घेतले. ऍशले गार्डनरने 2 बळी घेतले. तनुजा कंवर आणि मन्नत कश्यप यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.