वाघोली, (प्रतिनिधी)- सनी प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून केसनंद गावातील श्री पावन गणपती मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
पहाटे महाभिषेक पुजा, होमहवन विधी पार पडले. सकाळी 10 ते 4 या वेळेमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. या उपक्रमांमध्ये गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ/तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून जवळजवळ 211 बॅग रक्त संकलित केले. त्यानंतर महिला भजनी मंडळांची भजनरुपी सेवा संपन्न झाल्यानंतर किर्तन रुपी सेवा पार पडली आणि उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच मिलिंद हरगुडे, सरपंच प्रमोद हरगुडे, दत्ता हरगुडे, शंकरकाका वाबळे, दिनेश झांबरे, संतोष गावडे, गणेश हरगुडे, सोमनाथ सातव, मोहन झांबरे, नाथा जाधव, संजय झांबरे, रामदास सावंत, प्रशांत शिंदे, शंकर वाल्हेकर,अमर चव्हाणयांनी आलेल्या सर्वांना श्री गणेश जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. स्वागत लखन ढोरे तर राजेश दरेकर यांनी आभार मानले.