वाघोली, (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य प्रदेश लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. उदय डबले, प्रदेश प्रभारी अॅड. धर्मेद्र खांडरे, महाप्रदेश संघटनमंत्री रवीजी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाने अॅड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) लिगल सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक जिल्ह्यातील नेत्यांचे पक्षप्रवेश झाले तसेच पदाधिकारी बैठक घेण्यात आली.
अॅड. संजय सावंत (पाटील) हे गेली 5 वर्षांपासून भारतीय जनता पाट मध्ये पुणे जिल्हा कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य, स्वच्छ भारत अभियानमध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस, शिरुर लोकसभा संयोजक समिती सभासद, कायदेशीर सल्लागार या सर्व जबाबदार्यावर पूर्ण करीत आहेत.