मुंबई – अल्ट बालाजीच्या ‘गंदी बात-2’ या इरॉटिक ऑनलाईन सिरीजमधून आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात करणारी बोल्ड अभिनेत्री ‘अन्वेशी जैन’ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आणि त्यामुळेच का होईना अन्वेशी जैनने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी अन्वेशीने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. ती मूळची मध्यप्रदेशातील खजुराहो शहरातील असून तिने अभिनेत्री बनण्यासाठी एमबीएचे शिक्षण अर्ध्यावर सोडत मुंबई गाठली होती. आज तिने अभिनय क्षेत्रात आपला स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे.
View this post on Instagram
नेहमी सोशल मीडियावर अभिनेत्री अन्वेशी जैन आपल्या फोटोंनी धुमाकूळ घालत असते. तिने बऱ्याच साउथ आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. नुकतेच तिने शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला आहे. अन्वेशीच्या ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. या नवीन फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीचे मादक आणि हॉट दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री असण्यासोबतच अन्वेशी जैन गायिका, मॉडेल आणि टीव्ही होस्ट देखील आहे. तिने कॉर्पोरेट शोसह 100 हून अधिक टीव्ही शो होस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेत्रींचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. चाहते देखील तिच्या नवीन व्हिडिओ आणि फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात.