पुणे – नाट्यचित्रसृष्टीत नवोदितांना संधी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी एकास कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आली. मोहन उर्फ राजाशास्त्री मनोहर कुलकर्णी (रा.पालघर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका युवतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलकर्णी हा मुंबई, दिल्लीत राजाशास्त्री नावाने वावरत होता.
ऑक्टोबर महिन्यात तो तक्रारदार युवतीला भेटला. एका लघुपटात काम करण्याची संधी असल्याची बतावणी त्याने युवतीकडे केली होती. त्यानंतर त्याने सव्वा दोन लाख रुपये उकळले होते.