दावडी: येथील श्रीमंत महाराजा फत्तेसिंह गायकवाड विद्यलायात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य युवराज बनसोडे यांनी संविधान विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मच्छिंद्र धनवे, विलास बच्चे, सुशील मूळक, वंदना देने, सखाराम साबळे, रवींद्र दाभाडे, बंटी साबळे उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वखाली भारताची राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसुदा सामिती स्थापन झाली व 26 नोहेंबरला राज्यघटना तयार झाली. म्हणून संविधान दिन साजरा करण्यात येतो, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.