पुणे – आवकच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे मार्केट यार्डात रविवारी बोरे आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. थंडीमुळे मागणी घटल्यामुळे कलिंगडाच्या भावात घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे अननस, संत्रा, मोसंबी, सिताफळ, खरबूज, पपई, चिकू आणि डाळिंबांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, मोसंबी 40 ते 50 टन, संत्री 30 ते 35 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 20 ते 30 टेम्पो, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, चिक्कू 1 हजार गोणी, कलिंगड 10 ते 15 टेम्पो, खरबुजाची 15 ते 20 टेम्पो, सिताफळ 10 ते 20 टन, बोरे सातशे ते आठशे हजार गोणी इतकी आवक झाली आहे.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 100-150, अननस (डझन) : 70- 270, मोसंबी : (3 डझन) : 180-450, (4 डझन ) : 60-190, संत्रा : (10 किलो) : 100-300, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 30-200, गणेश : 10-50, आरक्ता 10- 60. कलिंगड : 5-8, खरबूज : 10-25, पपई : 5-12, चिकू : 100-500, सिताफळ 10-80