अलाहाबाद – करोनाच्या साथीच्या दुसऱ्या टप्प्याचा कहर सुरू असतानाच उद्यापासून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कुंभ मेळ्याला उद्यापासून सुरवात होत आहे. त्यामुळे हरिद्वार आणि अलाहाबादमध्ये प्रसासना करोना प्रतिबंधात्मक उपायांना वेग दिला आहे. करोनाची चाचणी आणि उत्तराखंडमध्ये प्रवेशबंदी यासह विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.
कुंभमेळ्याच्या जागी दररोज 50 हजार करोना चाचण्या घेण्याचे आदेश उत्तराखंड उच्च न्यायलयाने दिले आहेत. या शिवाय फिरती वैद्यकीय सुविधा तैनात करण्यात यावी. पार्किंग आणि घाटावर पात्र वैद्यकीय पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्राने दिलेल्या आदर्श आचर संहितेचे काटेकोर पालन करावे. त्याचा अहवाल 13 एफ्रिलपर्यंत उच्च न्यायलयात सादर करावा.
एका आश्रमात 32 जणांना करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यावर उत्तराखंड सरकारने एक एप्रिलपासून सुधारीत आचारसंहिता जारी केली आहे. त्यानुसार बाहेरून येणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. स्थानिकांना मात्र यातून वगळले आहे.
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तिसगढ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानातून एक एप्रिलनंतर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला करोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि साथीचा कयादा नुसार कारवाई करणार.
सुरक्षित कुंभ पार पाडण्यासाठी पोलिस महासंचालक अशोक कुमार यांच्याकडून 10 हजार पोलिस कर्मचारी आणि मिलष्करी दलाच्या जवानांना शपथ. भाविकांशी नम्रपणे वागण्याच्या सुचना.
केंद्रीय राखीव पोलिस दल आणि इंडोतिबेटीयन पोलिस दलाचे जवाम तैनात. त्यांच्याकडे करोना आचारसंहितेच्या पालनाची जबाबदारी कुंभमेळा महोत्सव चार महिने चालतो. मात्र करोनाच्या संकटामुळे यंदा तो एक महिन्याचा करण्यात आला आहे. त्यात 12, 14 आणि 28 एप्रिलला गंगास्नानाचे महत्वाचे मुहुर्त आहेत.