कोलंबस :- मोंटाना येथील एका नदीवरील पूल कोसळल्याने मालवाहू रेल्वे नदीत कोसळली आहे. या मालवाहू रेल्वेतून गरम डांबर आणि वितळलेल्या गंधकाची वाहतूक करण्यात येत होती. हे अत्यंत घातक विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्याने या नदीद्वारे होणारा पाणीपुरवठा त्वरित थांबवण्यात आला आहे. कोलंबस येथील यलोस्टोन नदीवील पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे.
ही रेल्वे कोसळल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाल्याची माहिती नाही. नदीच्या पाण्याला मोठा जोर असल्यामुळे हे घातक पदार्थ पाण्याबरोबर वाहून गेले आहेत.
गरम डांबर आणि वितळलेले गंधक हे दोन्ही पदार्थ थंड हवामानाच्या संपर्कात येताच ते घट्ट होतात. त्यामुळे त्यामुळे कोणताही दोका संभवत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डांबराच्या 3 आणि गंधकाच्या 3 वाघिणी या नदीमध्ये पडल्या आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
यलोस्टोन नदीच्या किनाऱ्यावर अत्यंत दाट लोकवस्ती असून ही नदी 177 किलोमीटर दूर असलेल्या यलोस्टोन राष्ट्रीय अभयारण्यापासून वाहते आहे. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यलोस्टोन कौंटीच्या अधिकारयांनी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. हे पाणी पिण्यासाठी वापरू नये, अशा सूचना स्थानिक नागरिकांना देण्यात आल्या आहेत.