- शासकीय सुविधांची दिली माहिती : अडीच हजार अर्ज भरून घेतले
वडगाव मावळ – आदिम (कातकरी) सेवा अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी कुटुंबातील व्यक्तींच्या जातीचे मोफत दाखले काढून देण्याचा उपक्रम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सुरू केला आहे. आतापर्यंत 2 हजार 400 फोटो लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. दिनेश दरेकर, रुपेश सोनुने, आकाश पवार, अक्षय भोकरे, मयुर अतकरे, मयुर झोडगे, नबीलाल अता आदी कार्यकर्ते मावळ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जात आदिम कातकरी बांधवांच्या जातीच्या दाखल्याची अर्ज भरुन घेत आहेत. याशिवाय आदिवासींना मिळणाऱ्या शासनाच्या सुविधा सांगत आहेत.
सह्याद्रीच्या डोंगर रांगा वसलेल्या मावळ तालुक्यात आदिम कातकरी लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 14 हजार 896 असू सद्यस्थिती सुमारे 19 हजार लोकसंख्या वास्तव्यात आहे. पूर्वाश्रमीपासून डोंगर दऱ्यात वास्तव करून मासेमारी व हंगामी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा अशिक्षित आदिम कातकरी विकासापासून वंचित राहिला. त्यांच्या जातीचे दाखले नसल्याने शासनाच्या सुविधांपासून कोसोदूर राहिला.
मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी कुटुंबातील व्यक्तींना जातीचे दाखले काढून देण्यासाठी आदिम (कातकरी) सेवा अभियानांतर्गत आदिवासी कातकरी कुटुंबातील व्यक्तींच्या जातीचे मोफत दाखले काढून देण्याचा उपक्रम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सुरू केला आहे. आतापर्यंत 2 हजार 400 लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. तालुक्यातील आदिम कातकरी विकासाच्या कक्षेत येणार असल्याने आमदार सुनील शेळके यांचे कौतुक केले.
मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यातील आदिम कातकरी समाजातील बांधव शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये. त्यांचे जीवनमान उंचावणे काळाची गरज आहे. आदिम कातकरी समाजाची मुख्य गरज ही जातीचे दाखले असून, आतापर्यंत 2 हजार 400 जातीचे अर्ज भरून घेतले आहेत.\