पिंपरी – सेंट्रींगचे साहित्य भाडेतत्वावर घेऊन ते परत न करता 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गायत्री कन्स्ट्रक्शनच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक चतुःभूज भतेजा (वय 48, रा. एमआयडीसी, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि. 26) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरेश विहारा अंबाडा (वय 35, रा. लिंगाळी, दौंड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. ही घटना 16 मार्च 2020 ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडली.
फिर्यादी दीपक यांचे सेट्रींगचे साहित्य पुरविण्याचा व्यवसाय आहे. तर आरोपी अंबाडा हे बांधकाम व्यवसायिक आहेत. आरोपी अंबाडा यांनी फिर्यादी दीपक यांच्याकडून सेंट्रींग साहित्य भाडेतत्वार घेतले होते. करारनाम्याची मुदत संपुष्टात आल्यावरही आरोपी अंबाड यांनी सेंट्रींगचे साहित्य स्वतःकडे ठेवले. भाड्यापोटी 15 लाख रुपये न देता एकूण 35 लाख रुपयांची फसवणूक केली.