ऑलिम्पिकमध्ये चौकार-षटकारांची मेजवानी!

ऑलिम्पिक 2028 स्पर्धेसाठी क्रिकेट संघ पाठवण्यास बीसीसीआयचा हिरवा कंदील

नवी दिल्ली  -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अखेर 2028मध्ये होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस एंजेलिस येथे पार पडणार आहे. तसेच महिला क्रिकेट संघ 2022 साली होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी होणार आहे.

हा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने घेतला आहे. क्रिकेट ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, बीसीसीआय यासाठी तयार नव्हती. अखेर शुक्रवारच्या बैठकीत ऑलिम्पिकसाठी बीसीसीआयने हिरवा कंदील दाखवला आहे.

मात्र, बीसीसीआयने यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. बीसीसीआयने स्वायत्तता कायम राहावी यासाठी लिखित हमी मागितली आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे संघ राष्ट्रीय खेळ संघाच्या अंतर्गत येतात. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अंतर्गत काम चालते. यामुळे स्वायत्त असलेल्या बीसीआयने भारतीय ऑलिम्पिक संघांच्या अंतर्गत काम करण्यास विरोध दर्शवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.