सर्वोच्च न्यायालयात चार नवे न्यायाधिश

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधिश नियुक्त करण्यात आले असून या चारही न्यायाधिशांनी आज आपल्या पदांची सुत्रे स्वीकारली. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली. त्यांच्या नियुक्‍त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या आता 31 झाली आहे. न्या बी.आर. गवई, सुर्यकांत, अनिरूद्ध बोस, आणि एस. ए. बोपण्णा अशी या नवनियुक्ती न्यायाधिशांची नावे आहेत.

न्यायालयाच्या कॉलेजियमने या चार जणांची नावे केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली होती. तथापी त्यातील दोन नावांना केंद्र सरकारचा आक्षेप होता व ती नावे त्यांनी कॉलेजियमकडे परत पाठवली होती. पण कॉलेजियने पुन्हा त्याच नावांचा आग्रह धरल्याने ती सरकारला स्वीकारावी लागली. सेवा ज्येष्ठता आणि प्रादेशिक प्रतिनिधीत्व या कारणांने सरकारने त्यांच्या नावांना विरोध दर्शवला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.